ट्रामा केअर सेंटरला भीषण आग; दोघांचा गुदमरून मृत्यू

Foto
कोल्हापूरमधील सीपीआर रुग्णालयातील ट्रामा केअर सेंटरला आज पहाटे भीषण आग लागली. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेत दोघांचा गुदमरून मृत्यू झाल्याची प्राथमिक अंदात वर्तवला जात आहे.
कोल्हापूरातील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयातील ट्रामा केअर सेंटरला आज पहाटेच्या सुमारास आग लागली. सीपीआरच्या या विभागात कोरोनाच्या अंतगंभीर 15 रुग्णांना उपचार सुरु होते. सुदैवाने येथील रुग्णांना 15 ही रुग्णांना वेळीच सुरक्षितरित्या स्थलांतरित करण्याल आले. परंतु एका रुग्णाचा हात भाजले असे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत मस्के यांनी सांगितले.
ही आग लागल्याचे लक्षात येताच सुरक्षारक्षक आणि डॉक्टरांनी इथल्या कोरोना रुग्णांना अपघात विभागात हलवले, मात्र यात महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या 2 कर्मचार्‍यांना इजा झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. आग लागल्याचे कळताच जिल्हाधिकारी दौलत देसाई घटनास्थळी पोहोचले.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker